पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गिन्नीसाठी कपिल घेणार कामातून छोटासा ब्रेक?

कपिल शर्मा- गिन्नी

कॉमेडीचा बादशहा कपिल शर्माच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार आहे. कपिल बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या मनोरंजन विश्वात सुरू आहे आणि याचसाठी कपिल 'द कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' मधून काही दिवसांसाठी ब्रेक घेणार असल्याचं समजत आहे. 

वयाला शोभतील असे कपडेच का घालावे? मलायकाचा सवाल

कपिलची पत्नी गिन्नी छत्रथ गरोदर असल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिलं आहे. गिन्नी गरोदर असल्याचं कळताच कपिलची आईसुद्धा त्यांच्यासोबत राहायला आली असल्याचं समजत आहे. गिन्नीला अधिक वेळ देता यावा यासाठी  कपिलने त्याच्या शूटिंगच्या वेळापत्रकातही बदल केला अल्याचं  समजत आहे. कपिल रात्री उशिरापर्यंत द कपिल शर्मा शोचं चित्रीकरण करायचा मात्र आता शुटींग लवकर संपवून गिन्नीसोबत वेळ घालवायला कपिल प्राधान्य देतो. 

अक्षय, प्रभास आणि जॉनमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर अटळ

 गिन्नीला  अधिक वेळ देता यावा यासाठी कपिल काही काळ विश्रांती घेणार आहे.  हे दोघंही काही काळ सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी शहराबाहेर जाणार असल्याच्याही  चर्चा आहेत.  पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना गिन्नी आणि कपिलची भेट झाली. तेव्हापासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. २०१७ मध्ये त्याने गिन्नीसोबतचा फोटो ट्विट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.  डिसेंबर २०१८ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली.