पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपिल शर्माच्या चिमुकलीचे फोटो व्हायरल

कपिल शर्मा

विनोदाचा बादशहा कपिल शर्माच्या चिमुकलीचे फोटो  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो कपिलच्या आईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधले असल्याचं म्हटलं जात आहे. १० डिसेंबर रोजी कपिलच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले होते. कपिलनं स्वत: ट्विटवर याची माहिती दिली होती. मात्र कपिलनं कधीही आपल्या चिमुकल्या परीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. 

जयंती विशेष : रंगभूमीच्या रंगात रंगलेले कलाकार

कपिलची मुलगी खूपच गोड असल्याचं यापूर्वी 'द कपिल शर्मा शो'मध्ये आलेल्या अनेक कलाकारांनी सांगितलं होतं. तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या परीला पाहण्याची उत्सुकता होती. अखेर कपिलच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कपिलच्या फॅन क्लबवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. कपिल आणि गिन्नी डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना गिन्नी आणि कपिलची भेट झाली होती.  त्यानंतर २०१८ मध्ये पंजाबमध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता. 

Confirmed : 'गो गोवा गॉन २' येतोय!