पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा

कपिल शर्मा- गिन्नी

प्रसिद्ध विनोदवीर  कपिल शर्माच्या  घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. कपिलची पत्नी गिन्नी छत्रतनं मुलीला जन्म दिला आहे. कपिलनं पहाटे ३ नंतर आपल्या चाहत्यांना ही 'गूड न्यूज' दिली आहे. कपिल आणि गिन्नी डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. कपिलवर जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूडमधून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दहा वर्षांच्या ब्रेकनंतर सुष्मिता परतणार बॉलिवूडमध्ये

 सायना नेहवाल, रकुल प्रीत, दिया मिर्झा, गुरु रंधावा, यांसारख्या सेलिब्रिटींनी कपिलला शुभेच्छा दिल्या आहेत. कपिलनं २०१७ मध्ये गिन्नीसोबतचा फोटो ट्विट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.  डिसेंबर २०१८ मध्ये कपिलनं गिन्नी सोबत लग्न केलं. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना गिन्नी आणि कपिलची भेट झाली होती. 

बलात्काऱ्यांना मृत्यूदंड नाही तर जन्मठेपेची शिक्षा द्या- वहिदा रहमान