पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपिल शर्मा- गिन्नीच्या घरी पाळणा हलणार ?

कपिल शर्मा- गिन्नी छत्रथ

 कॉमेडीचा बादशहा कपिल शर्माच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार आहे. कपिल बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या मनोरंजन विश्वात सुरू आहे.  गेल्यावर्षी डिसेंबर २०१८ मध्ये कपिल आणि गिन्नी विवाहबंधनात अडकले होते.

कपिलची पत्नी गिन्नी छत्रथ गरोदर असल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिलं आहे. गिन्नी गरोदर असल्याचं कळताच कपिलची आईसुद्धा त्यांच्यासोबत राहायला आली असल्याचं समजत आहे. गिन्नीला अधिक वेळ देता यावा यासाठी  कपिलने त्याच्या शूटिंगच्या वेळापत्रकातही बदल केला अल्याचं  समजत आहे. कपिल रात्री उशिरापर्यंत द कपिल शर्मा शोचं चित्रीकरण करायचा मात्र आता शुटींग लवकर संपवून गिन्नीसोबत वेळ घालवायला कपिल प्राधान्य देतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ਅਨੰਦ ਕਾਰਜ 😊🙏 @ginnichatrath @kaleereinbykanikakumria @punitarora.in @deepikasdeepclicks

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

त्याचप्रमाणे गिन्नी देखील द कपिल  शर्मा शोच्या सेटवर अनेकदा उपस्थिती लावते. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना गिन्नी आणि कपिलची भेट झाली. २०१७ मध्ये त्याने गिन्नीसोबतचा फोटो ट्विट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.  डिसेंबर २०१८ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली.