पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून कनिका कपूरची पोलिस चौकशी २० एप्रिलनंतरच

गायिका कनिका कपूर

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजारातून बरे झाल्यामुळे प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला लखनऊमधील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण या प्रकरणी तिच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तिची चौकशी २० एप्रिलनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुप्पट

रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला, तरी कनिका कपूर हिला पुढील १४ दिवस घरातच विलगीकरण पद्धतीने (होम क्वारंटाईन) राहण्यास सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिला ही सूचना केली आहे. त्यामुळे सध्या तिची चौकशी होऊ शकणार नाही. कनिका कपूर गेल्या महिन्यात ९ तारखेला लंडनहून परतली होती. त्यानंतर तिने आपल्या परदेश दौऱ्यांबद्दल माहिती लपविली होती. दुसरीकडे ती या काळात उत्तर प्रदेशात सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. आपल्याला झालेला संसर्गजन्य आजार लपविणे आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे यामुळे तिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन राज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध

भारतीय दंडविधान संहितेच्या कलम २६९ (गांभीर्य समजून न घेता धोकादायक वर्तन करणे) आणि कलम २७० (द्वेषपू्र्ण कार्य, संक्रमक होणे) नुसार कनिका कपूर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की सध्या प्रश्नांची यादी तयार करण्यात येत आहेत. कनिका कपूरचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर तिची चौकशी करण्यात येईल. त्यावेळी या प्रश्नावलीचा उपयोग होईल.