गायिका कनिका कपूरची कोरोना विषाणूची चाचणी तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या आठवड्यात कनिकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती लंडनमधून भारतात परतली होती. तिला होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, पण त्याकडे तिनं दुर्लक्ष केलं. कनिकाच्या संपर्कात आलेल्या शेकडो लोकांची चाचणी करण्यात आली. तिच्या संपर्कात अनेक सेलिब्रिटी, राजकारणी आले होते. कनिकावर लखनऊमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची तिसऱ्यांदा कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली. तिसऱ्यावेळीही तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
इटलीत 'कोरोना रिटर्न', एकाच दिवसात ७४३ जणांचा मृत्यू
कनिका आणि रुग्णालय प्रशासनात शाब्दिक वॉर
दरम्यान संजय गांधी PGIMS रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कनिकानं सोशल मीडियावर काही तक्रारी केल्या होत्या. तिच्या या तक्रारीनंतर PGIMS रुग्णालय प्रशासनानं कनिकाला चांगलच फटकारलं आहे. तिनं रुग्णालयात सेलिब्रिटी प्रमाणे नखरे दाखवू नये तिथं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना एका रुग्णाप्रमाणे सहकार्य करावं असं म्हणत तिला फटकारण्यात आलं होतं.