पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गायिका कनिकाची प्रकृती स्थिर, पाचव्यांदा देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्हच

गायिका कनिका कपूर

बॉलिवूड गायिका कनिका  कपूर हिची गेल्या आठवड्याभरापासून पाचव्यांदा कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली. पाचव्यांदाही कनिकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दर ४८ तासांनी कनिकाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या आठवड्यातही तिच्या चाचणीचे अहवाल आले असून तिच्या चाचण्या पॉझिटिव्हच दाखवत आहेत.

कनिका सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूड ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात  उपचार घेत आहेत. तिची प्रकृती सध्या स्थिर असून चिंता करण्याचं कारण नाही असं इथल्या डॉक्टरांनी आश्वस्त केलं आहे. ९ मार्चला कनिका लंडनमधून लखनऊमधील आपल्या घरी परतली होती.

अभिनेता सलमान खानच्या पुतण्याचा मुंबईत मृत्यू, खान कुटुंबीयांवर शोककळा

तिला १४ दिवस होम क्वारंटाइन होण्यास सांगितलं होतं मात्र तिनं सूचनांकडे साफ दुर्लक्ष केलं. यानंतर ती अनेक लोकांना भेटली. यात देशातल्या काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचा तसेच सेलिब्रिटींचा देखील समावेश होता. त्यानंतर तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.सूचना देऊनही बेजबाबदार वागणाऱ्या आणि इतरांचं आरोग्य धोक्यात घालणाऱ्या कनिकावर सोशल मीडियावर मोठी टीका करण्यात आली होती. 

२५ कोटी देणाऱ्या मोठ्या मनाच्या अक्षयचं पंतप्रधानांकडून कौतुक