पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कनिकाची चौथ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, कुटुंबीयांसाठी भावनिक पोस्ट

गायिका कनिका कपूर

लंडनहून परतलेल्या आणि कोरोना विषाणूची बाधा झालेल्या गायिका  कनिका कपूरची  चौथ्यांदा कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  गेल्या आठवड्यात तिच्या तीन चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यादेखील पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर कनिकानं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ हजार लोकांसाठी सलमान खानची आर्थिक मदत

तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबद्दल मी कृतज्ञ आहे, मात्र मी आयसीयुत नाही. मी ठिक आहे. माझ्या पुढच्या चाचणीचे  अहवाल निगेटिव्ह येऊ दे इतकीच मी प्रार्थना करते. घरी जाऊन मी कधी एकदा माझ्या मुलांना आणि कुटुंबीयांना भेटते असं झालंय, त्यांची खूपच आठवण येत आहे अशी भावनिक पोस्ट कनिकानं लिहिली आहे.

वेळ आपल्याला आयुष्याची कदर करायला शिकवते असं कनिकानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे, कनिका मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लंडनमधून लखनऊमध्ये परतली होती. तिला होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले होते, मात्र  तिनं या सूचनांकडे दुर्लक्ष केलं होतं. 

..म्हणून श्रीकृष्णाची भूमिका करण्यास टाळाटाळ करत होते नितीश भारद्वाज