पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कनिकानं 'नखरे' करणं बंद करावं, रुग्णालय प्रशासनानं फटकारले

बॉलिवूड गायिका कनिका कपूर

कोरोना विषाणूची लागण झालेली अभिनेत्री कनिका कपूर ही संजय गांधी PGIMS रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र  तिनं सोशल मीडियावर अनेक तक्रारी केल्या आहेत. तिच्या या तक्रारीनंतर PGIMS  रुग्णालय प्रशासनानं कनिकाला चांगलच फटकारलं आहे. तिनं रुग्णालयात सेलिब्रिटी प्रमाणे नखरे दाखवू नये  तिथं  रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना एका रुग्णाप्रमाणे सहकार्य करावं असं म्हणत तिला फटकारण्यात आलं आहे. 

लोकलमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना प्रवेश, ओळखपत्राची तपासणी

गायिका कनिका कपूर ही लंडनवरुन परतली होती. तिला शुक्रवारी  कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ती लखनऊमधल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. 'कनिकाला रुग्णालयातील अन्नच दिले जात आहे. तिनं आमच्यासोबत सहकार्य केलंच पाहिजे. तिला रुग्णालयात विलगीकरण  कक्ष पुरवण्यात आला आहे. ज्यात शौचालयाचीही सोय करण्यात आली आहे. या कक्षात बेड आहे.  टीव्हीसुद्धा देण्यात आला आहे.  तिच्या कक्षात एसीदेखील  आहे. या एसीत कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहिल  असा युनिटही बसवण्यात आला आहे.  तिची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे मात्र  तिनं सर्वप्रथम कलाकार म्हणून नाही तर एक रुग्ण म्हणून आपलं वर्तन ठेवलं पाहिजे असं या रुग्णालयाचे  संचालक आर. के. धिमान म्हणाले. 

जनता कर्फ्यूला यशस्वी करण्यासाठी सोनू निगम करणार ऑनलाईन कॉन्सर्ट

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार कनिका ११ मार्चला लंडनमधून भारतात  परतली. तिला होम क्वारंटाइन म्हणजेच घरीच थांबण्यासाठी सांगण्यात आले होते, मात्र तिनं  सूचनांकडे दुर्लक्ष केलं. कनिकाच्या संपर्कात आलेले अनेक लोक हे होम क्वारंटाइन असून त्याच्या कोरोना विषाणूच्या चाचण्या ही करण्यात आल्या आहेत त्यातले ४५ जणांचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत.