पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : कनिकाचा रिपोर्ट अखेर निगेटिव्ह, पण...

गायिका कनिका कपूर

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिचा कोरोना व्हायरस  रिपोर्ट हा अखेर निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी पाचवेळा तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. मागील काही दिवसांपासून कनिकाला लखनऊ येथील पीजीआय्या विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. शनिवारी आलेले रिपोर्ट हे दिलासा देणारे असले तरी कनिकाला आता आणखी एक चिंता सतावत आहे. 

कोविड-१९ : एकट्या मुंबईत एका दिवसांत ५२ रुग्ण, चार जणांनी गमावला जीव

परदेशातून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यांनंतर सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत कनिका अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. याप्रकरणी तिच्यावर सरोजनी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर या रिपोर्टसनंतर कनिकाने तिच्या वकीलांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. 

कोरोनाविरोधातील लढा एकत्रित लढू, मोदी-ट्रम्प यांच्यात एकमत!

२० मार्चला कनिका  कोरोनाबाधित असल्याची पुष्टी झाली होती. मागील १६ दिवसांपासून लखनऊच्या पीजीआय या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरु होता. जवळपास दोनदिवस आड तिच्या टेस्ट घेण्यात येत असल्याची चर्चाही रंगली होती. कनिकाची आणखी एक टेस्ट घेण्यात येणार असून दुसऱ्या रिपोर्टनंतरच तिला डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिले आहेत. कोरोना बाधित असताना कनिका शहरातील अनेक गर्दीच्या खासगी कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समोर आले होते. परदेशातून परतल्यानंतर कनिकाने विमानतळावर चाचणीसाठी नकार दिल्याचाही तिच्यावर आरोप आहे. कोरोनापासून सुटका मिळाल्यांतर तिला कायदेशीर लढा द्यावा लागणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kanika Kapoor Coronavirus Report Came Negative Now She Is Scared Of FIR That Was Filed Against Her In Lucknow