पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुक्त झालेल्या कनिकाने अखेर मौन सोडले

गायिका कनिका कपूर

गायिका कनिका कपूर कोरोना विषाणुमुळे चर्चेत आली आहे. कनिला कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून तिच्याबद्दल बर्‍याच बातम्या आल्या आहेत. तिच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप सुद्धा करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाच्या ३ चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आत सध्या ती क्वारंटाइन आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर कनिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत मौन सोडले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stay Home Stay Safe 🙏🏼

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

रामायणानंतर 'श्रीकृष्णा' मालिकाही पुनर्प्रकाशित होणार

कनिकाने सांगितले की, मला माहिती आहे की माझ्याबद्दल बरंच काही बोलले गेले. मी आतापर्यंत शांत राहिले त्यामुळे माझ्याबद्दल बरंच काही बोलण्यात आले. मी चूक आहे म्हणून मी आतापर्यंत शांत नाही. मला माहिती आहे की लोकांना चुकीची माहिती दिली गेली. लोकांना स्वत:हून खरं समजावं याची मी वाट पाहत होते. मी माझे कुटुंबिय, मित्र परिवार आणि माझ्या समर्थकांचे आभार मानते ज्यांनी अशा वेळी मला समजून घेतले. मात्र मी आता तुम्हाला काही खऱ्या गोष्टी सांगू इच्छिते.'

Video : कलाकार एकजूटीनं म्हणाले, पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ...

कनिकाने लिहिले की, 'मी सध्या लखनऊमध्ये आहे आणि माझ्या पालकांसोबत वेळ घालवित आहे. मी ज्या लोकांच्या संपर्कात आले होते ते सर्व ब्रिटनमधील असो मुंबईतील किंवा लखनऊमधील असो या सर्वांमध्ये कोरोनाची लक्षण नव्हती आणि त्यांच्या कोरोना तपासणी निगेटिविह आल्या होत्या. मी १० मार्च रोजी यूकेहून भारतात आले आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझी स्क्रीनिंग टेस्ट झाली. त्यावेळी मला स्वत:ला विलग ठेवणे आवश्यक आहे, असा सल्लादेखील देण्यात आला नव्हता. मला काहीच त्रास होत नव्हता म्हणून मी स्वत: ला विलग केले नाही.'

लॉकडाऊननंतर कनिका कपूर ठरली सर्वाधिक सर्च केली गेलेली महिला सेलिब्रिटी

कनिकाने पुढे असे देखील म्हटले आहे की, 'मी ११ मार्च रोजी माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लखनऊला गेले. त्यावेळी विमानतळावर माझे कोणतेही स्क्रीनिंग झाले नाही. १४-१५ मार्च रोजी मी मित्रांसोबत दुपारी आणि रात्रीचे जेवण केले. मी कोणत्याही पार्टीचे आयोजन केले नव्हते. मला १७-१८ मार्च रोजी काही लक्षणं जाणवली आणि १९ मार्च रोजी माझी कोरोनाची चाचणी करण्यात आली. २० मार्च रोजी माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३ कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर २१ दिवसांनी मला घरी सोडण्यात आले. ज्यांनी माझी काळजी घेतली त्या मी डॉक्टर आणि नर्सचे आभार मानते.'

झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत नव्या वेबीसीरिज