पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मणिकर्णिका'नंतर कंगनाचा चंद्रगुप्त मौर्यवर चित्रपट काढण्याचा मानस

कंगना राणौत

अभिनेत्री कंगना राणौत हिचा 'पंगा' चित्रपट प्रदर्शित होत आहे. कंगना  या चित्रपटाच्या प्रमेशनमध्ये सध्या व्यग्र  आहे.  गेल्यावर्षी कंगनाचा 'मणिकर्णिका' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून तिनं दिग्दर्शिका म्हणूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान  तिनं आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा मानस व्यक्त केला आहे.

' TikTok' व्हिडिओमधून भावना दुखावल्याबद्दल दीपिकानं माफी मागावी- कंगना

कंगनाला मौर्य साम्राज्याची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्य यांच्या जीवनावर चित्रपट  प्रेक्षकांसाठी आणायचा आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये इतिहासाला  योग्य तो न्याय मिळाला नाही असंही कंगनानं सांगितलं. 

 

बहिणीच्या उपचारासाठी वाईटातल्या वाईट चित्रपटातही काम केलं

नुकतीच कंगनानं तिच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. या निर्मिती संस्थेद्वारे ती नव्या चित्रपटांची निर्मिती करणार आहे. त्याचप्रमाणे कंगना या वर्षांत 'थलायवी'  या चित्रपटातही दिसणार आहे. कंगाचा ' पंगा' चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विनी अय्यर हिने केले आहे.