पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिर- बाबरी मशिद प्रकरणावर कंगना करणार चित्रपटाची निर्मिती

कंगना राणौत

अभिनेत्री कंगना राणौतनं 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आता कंगना लवकरच एका चित्रपटाची निर्मिती  देखील करणार आहे. कंगना ' अपराजिता अयोध्या' या चित्रपटातून  निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. राम मंदिर- बाबरी मशिद प्रकरणावर हा चित्रपट आधारलेला असल्याचं  मुंबई मिरर वृत्तप्रत्रानं म्हटलं आहे. 

त्या जाहिरात प्रकरणी गोविंदा, जॅकी श्रॉफला २० हजारांचा दंड

कंगना राणौतच्या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच चित्रपट आहे.  बाहुबली चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजयेंद्र प्रसाद या चित्रपटाची कथा लिहिणार आहे. अनेक लोक ज्या गोष्टींवर चर्चा करायला घाबरतात त्याच विषयावर कंगना चित्रपटाची निर्मिती करणार आहे, अशी घोषणा कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिनं केली. 

VIDEO: 'थलाइवी' चित्रपटाचा फस्ट लुक आणि टीझर प्रदर्शित

'गेल्या १०० वर्षांत राम मंदिर हा विषय अतिशय संवेदनशिल विषय होता.  मी  ८० च्या दशकात जन्माला आले, त्यावेळी आयोध्या हे नाव काही नकारात्मक कारणांमुळे माझ्या कानावर पडत होते. जिथे राजा राम जन्मले त्याच जमिनीचा एक तुकडा वादाचं कारण ठरला. आयोध्या प्रकरणानं भारतीय राजकारणाचा चेहरा बदलला. या प्रकरणाच्या निकालानं भारताची धर्मनिरपेक्षत जपली', असं कंगना म्हणाली.