पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंगा घेणाऱ्या कंगनाच्या बहिणीचं ट्विटर अकाऊंटच केलं बंद

रंगोली

कंगाची बहीण रंगोली चंडेल आणि वाद यांचं नातं अगदी घट्ट आहे. सोशल मीडियावर नेहमीच वादग्रस्त ट्विट करुन किंवा टीका करुन रंगोली ही नेहमीच चर्चेत असते, मात्र नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रंगोलीचं ट्विटर अकाउंट हे आता बंद करण्यात आलं आहे. 

'देव धावुनी आला' गाण्यातून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या प्रत्येकास सलाम

मात्र ट्विटरला भारतीयांविषयी पूर्वग्रह आहे आणि ट्विटर हे भारतीयांच्या विरोधीच आहे, असा आरोप रंगोलीनं केला आहे. मी माझं अकाऊंट पुन्हा सुरु करणार नाही. मी माझी बहीण अभिनेत्री कंगना राणौत हिची प्रवक्ता आहे, आणि तिच्या मुलाखतींची जबाबदारी ही माझी आहे. ती मोठी अभिनेत्री आहे, अशाप्रकारेचे पूर्वग्रह असलेल्या माध्यमांना वगळून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्याजवळ अन्य पर्यायही आहेत असं रंगोलीनं म्हटलं आहे. 

रामायणातल्या सीतेनं शेअर केला पंतप्रधान मोदींसोबतचा जुना फोटो

काही दिवसांपूर्वी रंगोलीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गोल्ड या चित्रपटाच्या दिग्दर्शिकेनं देखील केली होती. रंगोलीनं फेक न्यूज पसरवली आहे असा आरोप तिनं केला होता.