पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तापसी म्हणजे ब दर्जाची मिमिक्री आर्टिस्ट, कंगनाच्या बहिणीच्या पुन्हा 'पंगा'

रंगोली तापसी

अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली यांनी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांसोबत 'पंगा' घेतला आहे, त्यामुळे बॉलिवूडला हे काही नवं नाही. आपल्या रोखठोक मतांसाठी या दोघीही ओळखल्या जातात. आलिया भट्टनंतर  कंगनाच्या बहिणीनं आपला मोर्चा तापसी पन्नूकडे वळवला होता. या दोघांची भांडणं ट्विटरवर चांगलीच रंगली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनाला नवा टास्क म्हणून उपरोधिक टिका करणाऱ्या तापसीला कंगनाच्या बहिणीनं ब दर्जाची मिमिक्री आर्टिस्ट म्हटलं आहे.

अभिनेत्रीच्या वडिलांचा मृत्यू, लॉकडाऊनमुळे अंत्यदर्शनासही मुकली

रविवारी ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी प्रत्येकानं आपल्या घरातील दिवे मालवायचे आहेत आणि दिवा, मेणबत्ती लावायची आहे, यातून कोरोनामुळे आलेला अंधकार आपण घालवायचा आहे असं आवाहन मोदींनी केलं. शुक्रवारी व्हिडिओ मेसेजद्वारा मोदींनी हे आवाहन देशवासीयांना केलं होतं.

या आवाहनानंतर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिनं नवा टास्क मिळाला अशी उपरोधिक टिका केली होती. या टिकेनंतर लगेचच कंगनाच्या बहिणानं तापसीवर निषाणा साधला. मात्र हे बोलताना कंगनाच्या बहिणीनं मर्यादा ओलांडल्या असा आरोप नेटकरी करत आहेत. 

चित्रीकरण बंद असलं तरी 'राधे'च्या क्रू मेंबरला दिले सलमाननं पैसे