पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फोर्ब्समध्ये कंगनाच्या उत्पन्नाचे आकडे चुकीचे बहिणीचा दावा, मागितला पुरावा

कंगना राणौत

फोर्ब्स मासिकानं देशातील १०० सेलिब्रिटींच्या उत्पन्नाची यादी नुकतीच जाहीर केली. मात्र यात कंगनाच्या उत्पन्नाचे आकडे पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा तिची बहिण रंगोलीनं केला आहे. या यादीत कंगनाचं जितकं वार्षिक उत्पन्न दाखवण्यात आलं आहे त्यापेक्षा अधिक ती कर भरते असाही दावा तिच्या बहिणीनं केला आहे. 

CAA आंदोलनाविरोधातील ट्विटमुळे रजनीकांत वादात, द्रमुकची कडाडून टीका

कंगना उत्पन्नाच्या यादीत इतर बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा मागच्या स्थानावर आहे. ती या यादीत ७० व्या स्थानी आहे. तिचं या वर्षातलं वार्षिक उत्पन्न हे १७.५ कोटी असल्याचं म्हटलं आहे. मात्र  फोर्ब्सनं उल्लेख केलेल्या उत्पन्नाच्या आकड्यावर रंगोलीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 
''मी फोर्ब्सला आव्हान करते की त्यांनी मासिकात नमूद केलेल्या एका तरी सेलिब्रिटींचं उत्पन्न हे खरं असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं, ही केवळ प्रसिद्धी आहे. या मासिकानं नमूद केलेल्या उत्पन्नापेक्षाही अधिक कर कंगना भरते'', असं रंगोलीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
''तुम्ही सेलिब्रिटींच्या उत्पन्नाविषयी तर्कविर्क मांडू शकत नाही. अजूनही आर्थिक वर्ष संपलेलं नाही. कंगनाचं एकूण उत्पन्न किती आहे हे खुद्द कंगनालाही माहिती नाही. तिचे सारे हिशेब मी ठेवते, तिच्या अकाऊंट डिपार्टमेंटला ही माहिती असते आणि ती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येते,  अशावेळी तुम्ही उत्पन्नाचे आकडे कसे मिळवले? यावर स्पष्टीकरण द्या'' असंही रंगोली ट्विटमध्ये म्हणाली आहे. 

फोर्ब्स सेलिब्रिटी १०० यादीत सलमानची घसरण, अक्षय कुमार वरच्या स्थानी

फोर्ब्सनं जाहीर केलेल्या उत्पन्नांच्या आकडेवारीनुसार क्रिकेटपटू विराट कोहली उत्पन्नाच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याचे चालू वर्षातील उत्पन्न २५२.७२ कोटी रुपये इतके नोंदले गेले आहे.अक्षय कुमार यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे एकूण उत्पन्न हे २९३.२५ कोटी रुपये इतके नोंदले गेले आहे. तर सलमान खान यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे २०१९ मधील वार्षिक उत्पन्न २२९.२५ कोटी रुपये इतके नोंदले गेले आहे.यादीत पहिल्या दहा जणांमध्ये दोन अभिनेत्रींचा समावेश आहे. अलिया भट यादीत आठव्या स्थानावर तर अभिनेत्री दीपिका पदुकोण यादीत दहाव्या स्थानावर आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kangana Ranaut sister Rangoli Chandel has slammed Forbes India for their top celebrity list