अभिनेत्री कंगना राणौत ही बॉलिवूडमधल्या एका प्रभावी आणि खंबीर व्यक्तीमत्त्वापैकी एक म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये तिनं घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे. बॉलिवूडमध्ये काम मिळावं यासाठी घर सोडून आलेल्या कंगनानं एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सीएसएमटी स्थानकातील तिकीट घरात कंगना रेल्वे प्रवाशांच्या सेवेत
''मी बहिणीच्या उपचारांसाठी वाईटातल्या वाईट चित्रपटातही काम केलं असं कंगना मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. मी १९ वर्षांची होते तेव्हा रंगोलीवर अॅसिड फेकल्याची बातमी मला कळली. तिच्यावर मुंबईतल्या सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार व्हावे असं मला वाटत होतं मात्र माझ्याजवळ पैसे नव्हते. मी तिच्यासाठी वाईट चित्रपटातही काम केलं. जे माझ्यासाठी योग्य नाही असंही काम मी स्वीकारलं. तिच्यावर ५४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.' असं कंगनानं सांगितलं.
'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास नाही म्हणणारा सैफ वादात
कंगनाच्या पाठी रंगोली खंबीरपणे उभी राहिली. बॉलिवूडमधल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर रंगोलीनंही बेधडक भूमिका मांडल्या आहेत.