पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयललितांच्या बायोपिकसाठी कंगना घेतेय विशेष मेहनत

थलाइवी

तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाइवी' हा बायोपिक येत आहे. अभिनेत्री कंगना राणौत चित्रपटात जयललितांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी कंगनानं जयललिता यांच्या जीवनावर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरूवात केली आहे. पण त्याचबरोबर कंगनाच्या लूकवरही निर्मात्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.  हॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट जैसन कोलिंस कंगनाचा मेकअप करणार आहे. 

सुबोध भावेच्या 'विजेता' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

यासाठी प्रोस्थेटिक मेकअप करण्यात येणार आहे. प्रोस्थेटिकच्या चाचणीसाठी कंगना सध्या लाॅस एंजलिसमध्ये कोलिंस यांच्या  मेकअप स्टुडिओमध्ये आहे. तिथे प्रोस्थेटिक मेकअपची चाचणी सुरू आहे. कंगनानं याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला  आहे. जो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. जैसन कोलिंसनं कैप्टन मार्वेल' आणि 'ब्लेड रनर 2049' सारख्या चित्रपटासाठी  मेकअप केला होता.  

देशातल्या १०० ठिकाणी आमिरच्या चित्रपटाचं चित्रीकरण, हिंदीत विक्रम

लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. हा चित्रपट तामिळ व्यतिरिक्त तेलगू आणि हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.