पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिन्याचा शेवट 'काळ'नं होणार

काळ

बहुप्रतीक्षित हॉरर मराठी चित्रपट 'काळ’ 'चा दूसरा ट्रेलरही आज प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन डी संदीप यांनी केले असून मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी वाट चोखाळणारा हॉरर चित्रपट म्हणून ‘काळ’कडे पाहिले जात असताना त्याच्या दुसऱ्या ट्रेलरने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढविली आहे. पहिल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून हा सिनेमा येत्या ३१ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

पंतप्रधान मोदींनंतर 'Man vs Wild' मध्ये सुपरस्टार रजनीकांत

या ट्रेलरमध्ये युवकांचा एक चमू काही अद्भुत आणि अगम्य अशा गोष्टींचे खोटे चित्रफीत तयार करून पैसे कमवू पाहते आहे पण एकदा त्यांचा सामना कोकणातील आडोशाच्या एका बंगल्यात रात्रीच्या किर्र अंधारात खऱ्या भय, अद्भुत, अगम्य शक्तिशी होतो आणि मग त्याचे काय परिणाम होतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३१ जानेवारी रोजी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पहावा लागेल त्याचबरोबर काळ हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यानंतर रशियातील ३० शहरांमध्ये १०० स्क्रीनवर देखील प्रदर्शित होणार आहे. रशियामध्ये प्रदर्शित होणारा ‘काळ’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

पूजा भट म्हणते, ...म्हणून मी कधीच CAA-NRCला पाठिंबा देणार नाही

मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण 'काळ'च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर, नितीन वैद्य प्रॉडक्शन्सचे नितिन वैद्य, कांतीलाल प्रॉडक्शन्सचे डी संदीप आणि प्रवीण खरात व अनुज अडवाणी यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

VIDEO : रिंकूसाठी नेहा कक्करनं पहिल्यांदाच गायलं मराठीत गाणे