पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल'ची पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई

जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल

'जुमांजी', 'जुमांजी- वेलकम टु द जंगल' या दोन चित्रपटानंतर या सीरिजमधला तिसरा चित्रपट 'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल' गेल्या आठवड्यात भारतात प्रदर्शित झाला.  हॉलिवूड चित्रपटांची भारतात वाढत जाणारी क्रेझ पाहता 'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल'लाही भारतीय प्रेक्षकांचा विशेषत: बच्चे कंपनींचा  चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात 'जुमांजी- वेलकम टु द जंगल' च्या तुलनेत बक्कळ कमाई केली आहे. 

अफलातून नाटककार 'दि ग्रेट बबन प्रभू' !

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या कमाईच्या आकडेवारीनुसार चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. पहिल्या दिवशी १.१५ कोटी, दुसऱ्या दिवशी ५.०५ कोटी, तिसऱ्या दिवशी ८.३५ कोटी आणि चौथ्या दिवशी १०.१० कोटींची कमाई चित्रपटानं केली आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात एकूण २४.६५ कोटींची कमाई केली. राणी मुखर्जीच्या 'मर्दानी २' ला देखील चित्रपटानं मागे टाकलं आहे.  खास भारतीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. 

जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध