पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या जुलै महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची कमाई

जुलै महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट

जुलै महिना संपत आला आहे. या महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं बक्कळ कमाई केली आहे. त्यात कबीर सिंह, सुपर ३०, दी लायन किंग चित्रपट अव्वल ठरले आहेत. या चित्रपटांची महिना अखेरची कमाई जाणून घेऊ.

कबीर सिंह 
कबीर सिंह चित्रपट २१ जून रोजी देशभरातील ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. कबीर सिंह हा तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. कबीर सिंह हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं आतापर्यंत २७४. ३६ कोटींची कमाई केली आहे.

सुपर ३०
सुपर ३० ची बॉक्स ऑफिसवरील कमाई ही जोरदार सुरू आहे. या  कमाईत मुंबई, दिल्ली, म्हैसूर या शहरांचा आणि पंजाब राज्याचा मोठा वाटा आहे.  या चित्रपटानं ११३. ७१ कोटींची कमाई  केली आहे. गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आनंद  कुमार या गणिततज्ज्ञाची गोष्ट या चित्रपटात आहे. 

‘जजमेंटल है क्या’मधील 'त्या' पोस्टरची संकल्पना चोरीची, परदेशी कलाकाराचा आरोप

आर्टिकल १५
भारतीय जातव्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका आहे या चित्रपटानं ६४  कोटींचा गल्ला जमावला आहे. 

जजमेंटल है क्या 
गेल्या आठवड्यात कंगना आणि राजकुमार रावचा जजमेंटल है क्या प्रदर्शित झाला. या चित्रपटानं चार दिवसांत २१. ५ कोटींची कमाई केली आहे. पुढील आठवड्यात  हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासारखं ठरेन. 

स्पायडर मॅन फार फ्रॉम होम 
स्पायडर मॅन फार फ्रॉम होम हा चित्रपट तामिळ, तेलगू, इंग्रजी, हिंदी भाषेत ५ जुलैला भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं एकूण ८४ कोटींची कमाई केली आहे. 

गायक गुरू रंधावावर कॅनडात हल्ला

दी लायन किंग 
१९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे भारतीयांकडून  खूप चांगला प्रतिसाद या चित्रपटाला लाभला आहे. या  चित्रपटानं ११४ कोटींची कमाई केली आहे.