पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कयामत से कयामत तक' नं रातोरात पालटलं जूहीचं नशीब

जूही चावला

 अभिनेत्री जूही चावला ही बॉलिवूडमधल्या  सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होय. हसऱ्या, खोडकर  आणि बोलक्या स्वभावच्या जूहीनं अल्पावधीत तमाम प्रेक्षकांना आपलसं केलं. हसताना गालावर पडणाऱ्या खळीनं तिनं कित्येकांना घायाळ केलं. सोज्वळ, सुंदर अभिनेत्रींच्या भूमिकेबरोबरच तिनं खलनायिकाही उत्तम प्रकारे साकारली. जूहीचा  आज ५२ वा वाढदिवस आहे.

 बॉलिवूडमध्ये येण्याआधी तिनं 'मिस इंडिया' हा खिताबही जिंकला होता. एका खोडकर स्वभावाच्या मुलीची तिनं अनेकदा व्यक्तीरेखा  साकारली. 'इश्क', 'येस बॉस', 'हम हे राही प्यार के', 'ड्युपलिकेट',  'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'छुठ बोले कौवा काटे', सारख्या चित्रपटातील जूहीच्या भूमिका सर्वांनाच आवडल्या.  विशेष म्हणजे छोट्या पडद्यावर आमिर- जूही, जूही शाहरुख ही जोडी प्रेक्षकांना  खूपच आवडली.

सारा अली खानचा फिटनेस फंडा; जिममधील व्हिडिओ व्हायरल

 १९८६ मध्ये चित्रपट 'सल्तनत'मधून जूहीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. मात्र त्यानंतर दोन वर्षांनी आलेला 'कयामत से कयामत तक' या चित्रपटानं जूहीचं नशीब पालटलं. आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत असलेली जूही रातोरात स्टार झाली. 'कयामत से कयामत तक' हा बॉक्स ऑफिसवर  सर्वात हिट चित्रपट ठरला. 

चित्रपटातील सर्वोत्तम भूमिकेसाठी तिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर जुहीच्या वाट्याला  अनेक सुपरहिट चित्रपट आले. १९९७ साली आलेला 'इश्क' हा देखील जूहीचा हिट चित्रपट ठरला. योगायोग म्हणजे या चित्रपटातही ती आमिर खानची अभिनेत्री होती. 
रुपेरी पडद्यावरची गुणी अभिनेत्री म्हणून मिळवलेल्या प्रतिमेला छेद देत तिनं 'गुलाब गँग'मध्ये खलनायिकाही रंगवली. लवकरच जूही पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. जूही ही वेब चित्रपटात दिसणार आहे. 'आतापर्यंत प्रेक्षकांनी मला कधीही पाहिलं नसेल अशा भूमिकेत मी दिसणार आहे. ही भूमिका स्वीकारताना मी अनेकदा विचार केला. मला हे जमू शकतं का? हा प्रश्न मला सतावत होता. या  भूमिकेत मला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क बसेल हे नक्की', असं जूही म्हणाली.

'दबंग ३' मधून राहत फतेह अली खान यांची दोन गाणी वगळली

तूर्त या वेब चित्रपटाबद्दल अधिकची माहिती जूहीनं गुलदस्त्यात ठेवणं पसंत केली आहे. मात्र लवकरच ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे.