पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवडूमधील ही अभिनेत्री पतीशी घटस्फोट घेण्याच्या मार्गावर

अमृता पुरी आणि इम्रान सेठी

बॉलिवूडमध्ये रोज नव्या जोड्या तयार होत असतात आणि त्यापैकी काही जण पुढे जाऊन एकमेकांपासून दूरही होत असतात. काय पो चे आणि जजमेंटल है क्या या सिनेमांमधून अभिनय साकारणारी अमृता पुरी तिचा नवरा इम्रान सेठीशी घटस्फोट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नसल्यामुळे त्यांनी परस्परांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. स्पॉटबॉय या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

अडचणींवर मात करत आम्ही सरकार स्थापन केले: मुख्यमंत्री

अमृता पुरी आणि इम्रान सेठी हे दोघेही खूप दिवसांपासून वेगवेगळे राहात आहेत. इम्रान सेठी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एक नवे रेस्तराँ सुरू केले. त्यावेळी त्या कार्यक्रमाला अमृता पुरी दिसली नव्हती. या वेबसाईटवरील वृत्तानुसार या जोडप्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वादविवाद होताहेत. भांडणाला कंटाळून अमृता आधीच आपल्या माहेरी निघून गेली आहे. 

अमृता आणि इम्रान या दोघांच्या कुटुंबियांनी या दोघांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण दोघांमध्ये पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित होण्याची कोणतीची शक्यता नसल्याचे दिसल्यावर अमृताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

मुंबई पोलिसांना मोठे यश, गँगस्टर एजाज लकडावालाला बेड्या

या वृत्तानुसार २०१७ मध्ये अमृताने इम्रान सेठी यांच्याशी गुपचूपपणे लग्न केले होते. शीख आणि हिंदू रिती-रिवाजांप्रमाणे हे लग्न झाले होते.