पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘विक्की वेलिंगकर’ मध्ये सोनालीसोबत स्पृहाही मुख्य भूमिकेत

विक्की वेलिंगकर

‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी चित्रपटातील सोनाली कुलकर्णी आणि ‘मास्क मॅन’ यांचा वेगळा लुक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता, त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकतेच निर्मात्यांनी सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यातून एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या चित्रपटात सोनाली, ‘मास्क मॅन’सोबतच स्पृहा जोशीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टीआरपीच्या यादीत वादग्रस्त 'बिग बॉस १३' पडला मागे

स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे. या अडचणींचा सामना करण्यासाठी स्पृहा जोशी म्हणजेच विद्या ‘विक्की' ला मदत करणार आहे. 

अमरीश पुरी यांचा नातू करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

 आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की “मला सौरभ वर्मा यांची कथा सांगण्याची शैली मला खूप आवडली. ज्या प्रकारे ते कथा सांगत होते त्यावरून या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे आणि या कथेत असं काही आहे की जे मी या आधी कधीही पाहिलेलं नाही. कथा ऐकल्यानंतर माझ्या भूमिकेची लांबी किती आहे याचा मी विचार केला नाही कारण मला माहित आहे की विक्की वेलिंगकरच्या कथेत विक्की ही विद्या शिवाय अपूर्ण आहे. मला ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांनाही ही भूमिका बघताना खूप चांगला अनुभव येईल.”

गोविंदाच्या पत्नीला नको होती 'सपना', कृष्णा एपिसोडमधून गायब

सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.