पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सरफरोश'च्या सीक्वलमधून जॉन बाहेर

जॉन

आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शहा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'सरफरोश'चा सीक्वल येणार अशी चर्चा होती. या सीक्वलमध्ये  अभिनेता जॉन महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार होता. मात्र आता जॉन  सरफरोशमधून बाहेर पडला  असल्याचं समजत आहे. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू माथन या चित्रपटाचा सीक्वल आणणार  आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जॉन मॅथ्यू माथन चित्रपटावर काम करत होते.  तर जॉन अब्राहम या चित्रपटाची सहनिर्मिती करणार असता. मात्र चित्रपटाची आर्थिक बाजू जुळून आली नाही तसेच जॉन  पागलपंती चित्रपटात व्यग्र आहे. त्याचप्रमाणे  बाईक रेसिंगवर त्याचा आगामी चित्रपटही येत आहे. या  दोन्ही चित्रपटाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे जॉननं आता या चित्रपटातून काढता पाय घ्यायचं ठरवलं असल्याचं मिड डेनं म्हटलं आहे.  जॉनच्या  प्रवक्त्यांनी या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला आहे. जॉनला  सरफरोशच्या सीक्वलमध्ये काम करण्याची इच्छा होती मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाही म्हणूनच या प्रोजक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय जॉननं घेतला आहे अशी बाजू जॉनच्या प्रवक्त्यांनी मांडली आहे. 

'मी जॉनचा  कधीही  चित्रपटासाठी विचार केला नाही. जॉनचं नाव चित्रपटासाठी मी  निश्चित केलं नव्हतं. आम्ही  फक्त या चित्रपटाविषयी  चर्चा  केली होती'  असं  माथन म्हणाले. जॉन सरफरोशच्या सीक्वलमधून बाहेर पडल्यानंतर आता या चित्रपटात कोणाची वर्णी लागते हे पाहण्यासारखं ठरेन.