पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला केंद्रीत चित्रपटासाठी पैसे मिळवण्यात अडचणी, जॉनची खंत

'पागलपंती' चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होतोय

अभिनेता 'जॉन अब्राहम'चा 'पागलपंती' चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. अभिनयाबरोबरच जॉन निर्मिती क्षेत्रातही उतरला आहे. जॉन दोन वेब सीरिज आणि महिला केंद्रीत चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. मात्र आपल्याकडे महिला केंद्रीत चित्रपटांसाठी पैसा गोळा करणं कठीण असल्याची खंत जॉनन व्यक्त केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल वाहिनीची जाहीर माफी

महिला केंद्रीत चित्रपटासाठी पैसे खर्च करण्यासाठी दाखवल्या जाणाऱ्या उदासीनतेवर जॉननं नाराजी व्यक्त केली आहे. 'माझ्याकडे दोन उत्तम महिला केंद्रीत चित्रपट आहेत.  मात्र या चित्रपटांच्या विक्रीसाठी मला प्रत्येक स्टुडिओला मीनतवाऱ्या कराव्या लागत आहे. या चित्रपटासाठी पुरेसा पैसे खर्च करण्यास ते तयार होत नाही. चित्रपटसृष्टीत नवे बदल घडत आहेत असं म्हटलं जातं, मात्र आजही महिला केंद्रीत चित्रपटांसाठी पैसे मिळवण्याकरता अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बॉलिवूड हंगामाशी बोलताना व्यक्त केली आहे. 

'स्वत:च्या कमाईतून हॉटेलला भाडेतत्वावर दिलेलं पतौडी पॅलेस परत मिळवलं'