पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Batla House Vs Mission Mangal : अक्षयसोबत टक्कर, जॉन म्हणतो...

जॉन अब्राहम

येत्या १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांची टक्कर पहायला मिळणार आहे. अक्षयचा 'मिशन मंगल' तर जॉनचा 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. हे दोन्ही चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत.  या दोन्ही अभिनेत्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर रंगणाऱ्या या युद्धावर प्रथमच जॉननं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्यात आणि अक्षयमध्ये स्पर्धा नाही असं जॉननं स्पष्ट केलं आहे.

‘फोर्ब्स’च्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय एकमेव अभिनेता

'गरम मसाला',  'देसी बॉईज', 'हाऊस फुल २' यांसारख्या चित्रपटात अक्षय आणि जॉननं एकत्र काम केलं आहे. या दोन्ही अभिनेत्यांमध्ये घट्ट मैत्री आहे. मी आणि अक्षय एकमेकांच्या संपर्कात असतो, मी त्याला नुकताच मेसेज केला होता. आम्हा दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करण्यास अक्षयची हरकत नाही. चित्रपटगृहांची संख्या जास्त आहे  जो सर्वोत्तम चित्रपट असेन त्यास प्रेक्षक नक्कीच पसंती देतील असं, जॉननं स्पष्ट केलं आहे. 

'कबीर सिंह'नं कमाईच्या बाबतीत 'उरी'लाही टाकलं मागे

१५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर अक्षयचा 'मिशन मंगल' तर जॉनचा 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट  होतच आहेत पण त्याचबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा बिग बजेट अॅक्शन ड्रामा ' साहो' देखील प्रदर्शित होत आहे. या तीन चित्रपटांसोबत नेटफ्लिक्सची बहुप्रतिक्षित आणि वादग्रस्त वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स'देखील प्रदर्शित होत आहे.