पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गँगस्टरच्या दुनियेतील सत्य घटनेवर आधारित 'मुंबई सागा'

मुंबई सागा

मुंबई ही मायानगरी आहे. बॉम्बे पासून ते मुंबई होण्याच्या  या प्रवासात ही मायानगरी असंख्य घटनेची साक्षीदार झाली आहे. या मुंबईनं अनेक गँगवॉर पाहिलेत, या मायानगरीवर राज्य करू पाहणाऱ्या असंख्य गँगस्टरच्या महत्त्वाकांक्षेपासून ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टी तिच्या पोटात लपल्या आहेत. अशीच एक सत्य घटना 'मुंबई सागा' या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी,  जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकार या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. संजय गुप्ता यांनी शुट ऑउट अॅट लोखंडवाला, काँटे, काबिल यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा  प्रेक्षकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे', असं गुप्ता म्हणाले. 

या चित्रपटाचं कथानक ८० ते ९० च्या दशकातलं आहे. जेव्हा बॉम्बेची मुंबई होत होती. याच काळात एका गँगचा उदय झाला, चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे,  असं टी सीरिजचे भुषण कुमार म्हणाले. पुढील महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:John Abraham Emraan Hashmi will star alongside Jackie Shroff and Suniel Shetty in Mumbai Saga