पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेहद २ : सेटवर अपघात, अभिनेत्याच्या प्रसंगावधानतेमुळे बचावली जेनिफर

जेनिफर

 बेहद २ च्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातात मुख्य अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि तिचा सह कलाकार शिविन नारंग थोडक्यात बचावला आहे. एका बांधकाम ठिकाणी स्टंट करताना हा अपघात झाला असून शिविनच्या प्रसंगावधानतेमुळे जेनिफर गंभीर जखमी होण्यापासून बचावली. 

मकरंद देशपांडे पहिल्यांदाच करणार मराठी नाटकात अभिनय

एका बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी  बेहद २ चं चित्रीकरण सुरु होतं, त्यावेळी अपघात झाल्याचं वृत्त इंडिया टुडेनं प्रकाशित केलं आहे. जेनिफरनं हारनेस परिधान केलं होतं, स्टंट करताना सुरक्षेचे  सर्व उपाय करण्यात आले होते मात्र जेनिफरचा हारनेस अडकला आणि लिफ्टबरोबर तिही ओढत गेली. लिफ्ट वरच्या मजल्यावरून वेगात आली,  त्याचबरोबर जेनिफरही खाली आली. ती आदळणार इतक्यात शिविननं प्रसंगावधानता दाखवत तिला दूर खेचलं. यात शिविनच्या हाताला इजा झाली तर जेनिफरला किरकोळ जखम झाली. 

'तेव्हा लोकांना माझा विद्रुप चेहरा पहायचा नव्हता आणि आता.....'

शिविनमुळे जेनिफर अपघातापासून वाचली. या अपघातानंतर आम्ही दोघंही प्रचंड घाबरलो होतो असंही  शिविननं सांगितलं.