पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयेशभाई जोरदार : रणवीर सिंग साकारणार गुज्जू छोकरो

जयेशभाई जोरदार

'गल्ली बॉय', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'राम लीला', 'बँड बाजा बारात', अशा अनेक चित्रपटात एकापेक्षा एक वरचढ भूमिका करणारा अभिनेता रणवीर सिंग आता नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. रणवीर सिंग लवकरच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात एका गुजराथी मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

इंडियन आयडॉलच्या परीक्षकपदी अनु मलिकच्या जागी हिमेशची वर्णी

 रणवीरनं या भूमिकेसाठी आपलं वजनही कमी केलं आहे. आतापर्यंत रणवीरनं साकारलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका नक्कीच खूप वेगळी आणि हटके ठरणार आहे. 'जयेशभाई हा हिरो आहे. तो एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याच्या आयुष्यात एक गंभीर समस्या उद्भवते, अशावेळी हाच सर्वसामान्य माणूस एक  असामान्य कृती करत या संकटातून मार्ग काढतो. समाजात स्त्री- पुरुषांना समान वागणूक मिळाली पाहिजे असं मानणारी ही व्यक्तीरेखा असल्याचं रणवीरनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं. ही भूमिका साकारणं  खूपचा आव्हानात्मक होतं असंही रणवीर म्हणाला. 

आई असल्यामुळे 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं

रणवीरचा या चित्रपटाव्यतिरिक्त '८३' हा चित्रपटही पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. भारतानं जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची गोष्ट यात आहे.