पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जावेद अख्तरांनी कोरोना योद्धांवर हल्ला करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

जावेद अख्तर

एकीकडे संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रं-दिवस मेहनत करणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांवरच अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी व्हिडिओद्वारे देशवासियांना एक संदेश दिला आहे. 

'त्या' निर्लज्ज राज्यपालांची आठवण झाली, संजय राऊत यांचा निशाणा

शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर जावेद अख्तरांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी देशवासियांना खडेबोल सुनावले आहे. या व्हिडिओमध्ये जावेद अख्तरांनी सांगितले की, 'देश सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे आणि या संकटाशी लढा देण्यासाठी आपण एक झाले पाहिजे. जर आपण एकमेकांवर संशय घेतला, तर एकता नसताना आपण कसे ही लढाई लढू शकतो. 

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना सशर्त परवानगीः उद्धव ठाकरे

तसंच, 'डॉक्टरांना सलाम करा जे आपले जीवन धोक्यात घालून आपली चाचणी करुन आपल्यावर योग्य ते उपचार करत आहेत. आपल्याला कोरोनाचा आजार आहे की नाही हे चाचणीतून समजले जाईल आणि जर चाचणी सकारात्मक झाली तरच तुम्ही उपचार कराल. आपण त्यांच्यावर हल्ला करीत आहात हे अत्यंत दुर्दैवी आहे.', असे जावेद अख्तरांनी सांगितले. 

अमेरिका एक-एक मृत्यूचा बदला घेणार?, ट्रम्प यांनी दिली चीनला धमकी

जावेद अख्तरांनी पुढे असे सांगितले की, 'मी सर्व मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की आता रमजान येणार आहे. कोणीही घराबाहेर पडू नका. घरात थांबूनच नमाज पठण करा. योग्य ती खबरदारी घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या. तसंच, मी उर्वरित देशवासीयांना सांगेन की तुम्ही सर्वांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सर्वांनी एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे.'

राज्यातील ९५ टक्के चाचण्या निगेटिव्हः उद्धव ठाकरे