पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रभासची जादू जपानमध्येही, पदार्थांच्या पॅकेजवरही फोटो

प्रभासची जादू जपानमध्येही

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा 'बाहुबली' चित्रपटामुळे जगभरात लोकप्रिय झाला. प्रभासचा चाहतावर्ग केवळ दक्षिणेपुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण देशभरात आहे. इतकंच नाही तर दूरदेशी जपानमध्येही प्रभासचा मोठा चाहता वर्ग आहे. याची प्रचिती नुकतीच आली. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेंग्यू, उपचार सुरू

 जपानमधला प्रभासचा चाहता चक्क या सुपरस्टारचे फोटो असलेल्या काचेच्या बाटल्यांमधून पदार्थ विकत आहे. या विक्रेत्याच्या फूड पॅकेजवर प्रभासचेचे फोटो पाहायला मिळत आहेत. जपानमध्येही आपले चाहते असल्याचं पाहून प्रभासही अवाक् झाला आहे.  प्रभासनं या चाहत्याचे आभार मानले आहेत.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं दीपिका- रणवीरचं देवदर्शन

प्रभासचा 'साहो' चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक बजेट असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रभास लवकरच 'अमौर' चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.