पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लस्ट स्टोरीज्'नंतर नेटफ्लिक्सवर 'घोस्ट स्टोरीज्', जान्हवी प्रमुख भूमिकेत

जान्हवी कपूर

'लस्ट स्टोरीज्'नंतर आता नेटफ्लिक्स 'घोस्ट स्टोरीज्' ही लघू चित्रपटांची सीरिज घेऊन येत आहेत. यातल्या एका लघूपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. त्यात जान्हवी कपूर आणि विजय वर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. या लघूपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. 

'कुछ कुछ होता है' च्या रिमेकसाठी त्या तीन कलाकारांनाचं घ्यावं, करणची इच्छा

नुकतीच जान्हवी कपूरनं झोयाची भेट घेतली. या भेटीनंतर आता झोयानं इन्स्टाग्रामपोस्टवर नेटफ्लिक्सच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली. झोया अख्तर जान्हवीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. जान्हवी गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त रुह अफ्जा,  दोस्ताना २, तख्त यांसारख्या चित्रपटातही ती झळकणार आहे. 

कोल्हापूर- सांगली पूरग्रस्तांना अक्षय कुमारचा भावनिक संदेश, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन

'घोस्ट स्टोरीज्' मध्ये एकूण चार लघूपटांची श्रृंखला असणार आहे. या चार लूघपटांचं दिग्दर्शन झोया अख्तर, अनुराग कश्यप, करण जोहर आणि दिबाकर बॅनर्जी करणार आहेत. यापूर्वी चौघांनी नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज्'साठी एकत्र काम केलं होतं.