पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गरीब मुलांना मदत करतानाचे माझे फोटो काढू नका, जान्हवीची विनंती

जान्हवी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरनं २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीचे फोटो टिपण्यासाठी नेहमीचं छायाचित्रकारांची गर्दी तिच्या घराबाहेर, जिमबाहेर पाहायला मिळते. जान्हवीचा दानशूर स्वभाव अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. रस्त्यात भेटणाऱ्या गरीब मुलांना जान्हवी अनेकदा मदत करताना दिसली आहे. 

'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील सोहम आहे फिटनेस ट्रेनर

काहीदिवसांपूर्वी गरीब मुलीला मदत करण्यासाठी जान्हवीनं ड्रायव्हरकडून पैसेही उधार घेतले होते. तिच्या दानशूर स्वभावाचं अनेकदा कौतुक होतं. मात्र लहान मुलांना मदत करताना, उगाच माझे फोटो टिपू नका अशी विनंती तिनं छायाचित्रकारांना केली आहे. 

..म्हणून आजतागायत रविनानं पाहिला नाही 'अंदाज अपना अपना'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Helpful #janhvikapoor ❤ #vbapp #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

काही सेकंदासाठी कॅमेरा बंद करा, प्रत्येकवेळी फोटो टिपताना पाहून खूपच विचित्र वाटतं, असं जान्हवी म्हणाली. जान्हवीला चांगल्या  मनानं लहान मुलांना मदत करायची आहे, मात्र मदत करताना त्याचे सारखे फोटो टिपणं जान्हवीला पटत नाही म्हणून तिनं फोटो काढायला नकार दिला असं तिच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलं.

ईदला अक्षय- सलमानची टक्कर अटळच