पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जॅकलिन ‘मिसेस सीरियल किलर’च्या रुपात

मिसेस सीरियल किलर

रुपेरी पडद्यावर काम केलेले  अनेक स्टार आता बेव सीरिजकडे वळू लागले आहेत. वेब सीरिजनां मिळणारी तुफान प्रसिद्धी पाहता  अनेक स्टार्सनं याही क्षेत्रात नशीब आजमावून पाहण्याचं ठरवलं आहे. याला अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस अपवाद कशी ठरेल. नेटफ्लिक्सच्या ओरिजनल चित्रपटातून  जॅकलिन आता  वेब सीरिजच्या विश्वात पदार्पण करत आहे. 

‘मला हे सांगण्यास आनंद होत आहे की माझा नेटफिक्स ओरिजनल चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव मिसेस सीरियल किलर आहे. मी या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे’ असे जॅकलीनने ट्विट केले आहे. जॅकलीनचा मिसेस सीरियल किलर हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असल्याची चर्चा आता तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. 

नेटफ्लिक्सची भारतीयांमधली क्रेझ पाहता कंपनीनं आगामी काळात भारतीयांसाठी चित्रपटाची निर्मिती करण्याकडे लक्ष्य केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. ‘मिसेस सीरियल किलर’ची निर्मिती फरहा खान करणार आहे. फराहचे पती शिरीष कुंदर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या भूमिकेत असणार आहे. 
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती अद्यापही समजली नाही येत्या वर्षभरात  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे.