पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल, नियामक मंडळाकडून अधिकृत घोषणा

जब्बार पटेल

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत जब्बार पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली. 

अनुष्कानंतर आता विराटचाही होणार सन्मान

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रसाद कांबळी म्हणाले की, जब्बार पटेल यांच्या नावाची आम्ही यापूर्वीच शिक्कामोर्तब केला होता. आज बैठकीनंतर अधिकृतरित्या नावाची अधिकृत घोषणा करत आहोत. १०० व्या नाट्यसंमेलनाबाबत अनेक तर्कवितर्क रंगले होते. मात्र या निवडीनंतर सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कलाप्रेमी असून ते नाट्यपरिषदेला सर्व सहकार्य करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

शोले चित्रपटातील अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचं निधन

यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे १०० वे वर्ष आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांचे अर्ज आले होते. यापूर्वी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या चर्चेनंतर पटेल यांच्या नावाला एकमताने पंसती देण्यात आली होती. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्यामुळे नाट्यसंमेलन होणार की नाही? याबाबत चर्चा रंगली होती.