पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IT’S OFFICIAL : 'कुली नंबर १' चा २४ वर्षांनंतर रिमेक

वरूण धवन

गोविंदा, कादर खान, डेव्हिड धवन असं कॉमेडीचं भन्नाट त्रिकुट एकत्र येऊन तयार झालेला सुपरहिट चित्रपट म्हणजे 'कुली नंबर १' होय.  साधरण २४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला  होता. त्यावेळी घसघशीत कमाई या चित्रपटानं केली होती. या चित्रपटाचा  रिमेक लवकरच येणार अशा चर्चा होत्या आता वरुण धवनच्या वाढदिवशी चित्रपटाच्या रिमेकची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

वरुण धवनचा २४ एप्रिलला वाढदिवस असतो आणि २४ वर्षांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा वरुणच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चित्रपटाची औपचारिक घोषणा दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी केली आहे. जवळपास २५ वर्षांपूर्वी एकत्र काम केलेले  डेव्हिड धवन आणि वासू भगनानी या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र येणार आहे. कुली नंबर १ च्या रिमेकमध्ये सारा अली खान मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असणार आहे.

काही दिवसांपासून सारा अली खान आणि आलिया भट्ट अशी दोन नावं कुली नंबर १ च्या रिमेकसाठी चर्चेत होती. अखेर साराची वर्णी चित्रपटासाठी लागली आहे. ऑगस्ट २०१९ पासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. तर २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

गोविंदा, कादर खान, करिश्मा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. गोविंदा, कादर खान, डेव्हिड धवन या त्रिकुटांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी हा एक मानला जातो. या चित्रपटानं त्याकाळी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कमाई केलीच होती पण चित्रपटातली गाणीही तुफान हिट झाली होती. आता वरुण आणि साराची केमिस्ट्री असलेल्या कुली नंबर १ च्या रिमेकला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखं ठरेल.