पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्रीच्या घरावर प्राप्तिकर विभागाची धाड, २५ लाखांची रोकड जप्त

रश्मिका

प्राप्तिकर विभागानं दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंधनाच्या घरावर छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यानं तिच्या घरातून २५ लाखांची रोकड आणि प्रॉपर्टी संदर्भातील दस्ताऐवजही जप्त केले आहे.  गुरुवारी तिच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. 

Blog : ...पण तू "अबोल" राहून योग्य उत्तर दिले!

ज्यावेळी छापे टाकण्यात आले होते तेव्हा रश्मीका घरी नव्हती. ती चित्रीकरणासाठी शहराबाहेर होती. जेव्हा प्राप्तीकर विभागाचे अधिकारी घरी पोहोचले तेव्हा त्यांना काही कागदपत्रे आणि रोकड सापडली.  तिच्या पालकांकडे याबद्दल अधिक चौकशी केली मात्र त्यांच्याकडून योग्य स्पष्टीकरण मिळाले नाही, असंही अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

अभिनेत्याला चाहतीकडून त्रास, कौटुंबिक जीवनावर परिणाम

रश्मीकानं अनेक कन्नड आणि तेलगु चित्रपटात काम केलं आहे. तिनं  तेलगू चित्रपट जर्सीच्या हिंदी रिमेकसाठी मोठी मानधन मागितलं असल्याचंही समजत आहे.