पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार : हे गृहमंत्रालयाचे अपयश; रजनीकांत यांची टीका

रजनीकांत

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावरून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार हा गुप्तचर विभाग आणि अर्थात गृहमंत्रालयाचं देखील अपयश आहे, अशी  टीका रजनीकांत यांनी केली आहे. 

कोरोना : जपानच्या जहाजात अडकलेले ११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी परतले

'दिल्ली हिंसाचार हा गुप्तचर विभाग अर्थात केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. निषेध हा हिंसेनं नाही तर  शांततेत करणं गरजेच आहे. आणि निषेध करताना हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे मोडूनही काढता आला पाहिजे, असं परखड मत मांडत रजनीकांत यांनी गृह मंत्रालयावर टीका केली आहे. ईशान्य दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारात बळी गेलेल्यांचा आकडा हा ३० वर गेला आहे. तर २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

मराठी भाषा दिन विशेष : मराठी शिक्षणाचे भविष्यचित्र

हिंसाचाराच्या प्रकणात १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घटनास्थळी जाऊन  नागरिकांशी संवाद करत परिस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणचा आढावा घेतल्यानंतर डोवाल यांनी रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत दिल्लीतील परिस्थितीची माहिती त्यांना दिली.

वायुसेनेच्या विमानातून चीनमधल्या ७६ भारतीयांना आणले माघारी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:It is an intelligence failure and hence Home Ministry also failed Delhi violence Rajinikanth