पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MeToo : ...तर गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या, तनुश्रीच्या बहिणाचा MeToo मोहिमेला पाठिंबा

तनुश्री दत्ता- इशिता दत्ता

अभिनेत्री तनुश्री दत्ता बॉलिवूडमधल्या MeToo मोहिमेची प्रणेती म्हणून ओळखली  जाते.  २००८ मध्ये ती  ज्या अनुभवांना समोरी गेली त्या अनुभवाचं कथन  तिनं केलं. आपल्यावर झालेल्या अत्याचाराला तिनं वाचा फोडली.  मनोरंजन विश्वात होणाऱ्या लैंगिक गैरवर्तणुकीवर तिनं आवाज उठवला  त्यानंतर अनेक महिला पु़ढे आल्या या क्षेत्रात घडणाऱ्या अन्यायाचं  खरं रुप महिलांनी जगासमोर आणलं. तनुश्रीमुळेच एक चांगला बदल घडला आणि याचा मला अभिमान आहे. मला यासाठी तिचे आभार मानायचे आहेत असं तिची बहिण इशिता दत्ता म्हणाली.

इशिता हीदेखील चित्रपटात काम  करते. तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र या  प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लिन चिट दिल्याच्या चर्चाही माध्यमात आहे. हे वृत्त तनुश्रीनं फेटाळून लावलं आहे.  'हे प्रकरण कुठे आलं हे मला माहिती नाही. मात्र मला तो दिवस खूप चांगला आठवतोय त्यादिवशी जर पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर गोष्टी हाताबाहेर गेल्या  असत्या.  हॉर्न ओके प्लीजच्या चित्रीकरणानंतर नेमकं काय झालं हे सगळ्यांना माहितीये. या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. तेव्हा लोकांचा जमाव इतका होता की कदाचित तिच्या गाडीची  काच तुटून काहीतरी विपरित घडलं असतं  मात्र तनुश्री  शांत बसली नाही ती न्याय मिळवण्यासाठी  लढते आहे तिच्यामुळे अनेक महिलांना अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं बळ मिळालं  असं म्हणत तिनं तनुश्रीचे आभार मानले  आहे.

 या क्षेत्रात काम करताना बहिणीला वाईट अनुभव आला असताना तू या क्षेत्रात येण्याचा निर्णय कसा घेतला हा प्रश्नही तिला विचारण्यात आला. या क्षेत्रात येण्यासाठी तनुश्रीनंचं आपल्याला प्रोत्साहन दिल्याचं इशिता  आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.