पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजारपणानंतर इरफान पहिल्यांदाच चित्रपटात, अंग्रेजी मीडियम ट्रेलर लाँच

अंग्रेजी मीडियम

आजारपणावर मात करून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पाऊल ठेवण्यासाठी अभिनेता इरफान खान सज्ज झाला आहे. इरफानच्या बहुप्रतिक्षीत अशा 'अंग्रेजी मीडियम'चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. इरफानचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड या ट्रेलरच्या प्रतिक्षेत होते. 'हिंदी मीडियम' या चित्रपटाला देशभरातूनच नाही तर चीनमध्ये देखील भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर याचा  दुसरा भाग काढण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. 

Video : 'स्वीटी सातारकर'चा नादच नको

आपल्या मुलीला लंडनमधल्या शाळेत उच्च शिक्षणासाठी पाठवण्याकरता धडपडणाऱ्या वडिलांची ही कथा आहे. स्वत:चं फारसं शिक्षण झालं नसताना मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी  वाट्टेल ते करू पाहणाऱ्या छोट्या शहरातील  वडील आणि त्याच्या मुलीभोवती चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटात  इरफाननं वडिलांची भूमिका साकारली आहे.

चित्रपटात इरफान खान, राधिका मदन, करिना कपूर, दीपक डोब्रीयाल, डिंपल कपाडीया यांची प्रमुख भूमिका आहे. २० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये दिसणार ही अभिनेत्री