पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता इरफान खान ICUत

इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याची तब्येत बिघडली असल्यानं त्याला मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इरफान खान आयसीयूत आहे त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातील त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

'इरफान खान हा अतिदक्षता विभागात आहे, सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली तो आहे.  तो लढवय्या आहे आणि नक्कीच तो या परिस्थितीवरही मात करेल. त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे त्याचबरोबर जगभरातल्या त्याच्या शुभचिंतकाच्या प्रार्थनाही त्याच्यासोबत आहेत तो नक्कीच या परिस्थितीतून मार्ग काढेन, असं इरफान खानच्या प्रवक्त्यानं सांगितलं. 

राज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू

इरफानच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी माहितीही दिली जाईन असंही ते म्हणाले. तसेच इरफानच्या तब्येतीबद्दल कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. इरफानला २०१८ मध्ये न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारखा दुर्धर आजार झाला होता. 

परदेशात जवळपास  वर्षभर उपचार घेतल्यानंतर इरफान बरा झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये इरफाननं चित्रीकरणाला सुरुवात केली त्याचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट हा मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. 

अमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू