पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे फटका बसलेल्या 'अंग्रेजी मीडियम'चा ऑनलाइन प्रिमियर

अंग्रेजी मीडियम

लॉकडाऊनचा मोठा फटका हा इरफान खानच्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाला बसला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसांत चित्रपटगृह बंद करण्यात आली. त्यामुळे या चित्रपटानं केवळ ९. ३६ कोटींचीच कमाई केली. इरफानसोबत  करिना कपूर, दिपक डोब्रीयाल, राधिका मदन यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात होत्या. हा चित्रपट आता हॉटस्टार व्हीआयपीवर लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कनिकाचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

सोमवारी अभिनेता इरफान खान यानं ट्विटरवर यासंबधी घोषणा केली. १३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला. इरफान खान एका गंभीर आजारावर उपचार घेत होता. या आजारावर मात करुन इरफान बरा झाला. आजारपणावर मात केल्यानंतर हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र चित्रपटाच्या कमाईचं आर्थिक गणित बिघडल्यानंतर हा चित्रपट हॉटस्टारवर लाँच करण्यात आला आहे.

रकुल प्रीतनं केली झोपडपट्टीतील २०० कुटुंबीयांच्या जेवणाची व्यवस्था