पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली

इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनानं  कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिग बींपासून ते लता मंगेशकरपर्यंत सगळ्यांनीच सोशल मीडियावर  हळहळ व्यक्त केली आहे. 

इरफान यांच्या निधनाचे वृत्त वाचून खूप दु:ख झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते असं ट्विट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं आहे. 

तर इरफान यांच्या  अचानक जाण्यानं खूप धक्का बसला आहे ही अत्यंत दुखद बातमी होती. इरफान हे अत्यंत हुशार व्यक्तीमत्त्व होतं. सिनेसृष्टीत त्यांनी मोलाचं  योगदान दिलं होतं, असं ट्विट बिग बींनी केलं.

दिग्दर्शक सुजीत सरकार यांनीही ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. इरफान खूप लढला, मला त्याचा अभिमान आहे. तुझ्या आत्म्याला शांती लाभो असं सरकार यांनी म्हटलं आहे.

इरफान खान शेवटपर्यंत लढला, आपण चित्रपट सृष्टीतलं मौल्यवान रत्न गमावलं आहे, असं बोनी कपूर यांनी म्हटलं आहे. अभिनेता अक्षय कुमारनंही ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे, रितेश देशमुख अजय देवगनसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.