पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटर इरफान - हरभजन करणार चित्रपटात काम

इरफान - हरभजन

किक्रेटच्या मैदानात शानदार कामगिरी करणारे  क्रिकेटर इरफान खान- हरभजन सिंह लवकरच रुपेरी पडद्यावर पाऊल ठेणार आहेत. ते दोघंही तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. इरफान पठाण विक्रम यांच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर शांतानाम यांच्या तमिळ कॉमेडी चित्रपटात हरभजन सिंह एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या कोयना मित्राचा सलमानवर आरोप

 इरफानला आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानात पाहिलं आहे, या चित्रपटातून इरफान एका वेगळ्या रुपात चाहते आणि प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नक्कीच सर्वांसाठी आनंदाची बाब असणार आहे. लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचं समजत आहे.

दत्तक घेतलेल्या मुलीचा सनीनं थाटामाटात केला वाढदिवस साजरा

तर हरभजन सिंह तामिळ चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हरभजननं मुझसे शादी करोगी आणि काही पंजाबी चित्रपटात भूमिका साकारली  होती.