पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

International Yoga Day 2019 : लहान मुलांना योग विषय अनिवार्य हवा, शिल्पाचं मत

शिल्पा शेट्टी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिन योग विद्या शिकून एक निरोगी आरोग्यशैली अंगीकारली आहे. शिल्पा गेल्या १५ वर्षांपासून  नियमितपणे योग करत आहे. योग गुरू  बाबा रामदेव यांच्यासोबत मिळून  तिनं योगसनांचं महत्त्वही पटवून सांगितलं होतं. 

International Yoga Day : नियमित योग करा, आरोग्याच्या या समस्या दूर पळवा

शिल्पा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर योग विद्येचा प्रचार करताना पहायला मिळते. ४४ वर्षांच्या शिल्पाच्या फिटनेस आणि तारुण्याचं रहस्यच योग साधना आहे. अधिकाधिक तरुण  दिसण्यासाठी मी योगासनं करत नाही तर योग हा  माझ्या आयुष्यातील नित्याचा भाग झाला आहे. योग मला शांत ठेवण्यास मदत करतो.  मला सूर्यनमस्कार हा  प्रकार सर्वात आवडतो, कारण त्यामुळे शरीर लवचिक होतं शिल्पा हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना योग साधनेबद्दल भरभरून सांगत होती. 

International Yoga Day 2019 : अभिनेत्रींची योग साधना

शिल्पाचा मुलगा विवान देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत योग विद्या शिकत आहे. विवान शाळेत योगासनं करतो. प्रत्येक शाळेत योग हा विषय अनिवार्य असला पाहिलं हे मला मनापासून  वाटतं असंही मत तिनं व्यक्त केलं. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:International Yoga Day 2019 Shilpa Shetty feel yoga should be made a compulsory subject for kids