पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

International Yoga Day 2019 : अभिनेत्रींची योग साधना

योग

बॉलिवूडमधल्या सर्वच अभिनेत्री त्यांच्या फिटनेसला प्राधान्य देतात. प्रत्येकानं सर्वोत्तम आरोग्यशैली स्वीकारली  पाहिजे असं बॉलिवूड अभिनेत्री आवर्जून सांगतात. यातल्या काही अभिनेत्री या स्वत: अनेक फिटनेस ब्रँडच्या सदिच्छादूत आहेत. फिट राहायचं असेल तर दिवसांतून थोडा वेळ हा स्वत:साठी काढलाच पाहिजे. वेळात वेळ काढून  प्रत्येकानं योगसनं किंवा इतर व्यायाम प्रकारांना प्राधान्य दिलं पाहिजे अशा फिटनेट टिप्स अभिनेत्री आवर्जून देतील. यात शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, जॅकलिन फर्नांडिस, आलिया भट्ट यांसारख्या अभिनेत्री आल्या.  या सर्व अभिनेत्रींनी जिममधील व्यायम प्रकाराबरोबरच फिट राहण्यासाठी योग साधनेलाही प्राधान्य दिलं आहे. 

शिल्पा शेट्टी 
बॉलिवूडमध्ये योगसाधनेच्या प्रचाराचं सर्वाधिक श्रेय हे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दिलं जातं. शिल्पा  गेल्या पंधरा वर्षांपासून योग करत आहे. बाबा रामदेव यांच्यासोबत मिळून  तिनं योगविद्येचा प्रसार केला. शिल्पाचे योग व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. 

मलायका अरोरा 
वयाची चाळीशी ओलांडलेल्या मलायकाच्या उत्तम आरोग्याचं रहस्य म्हणजेच योगा होय. मलायकानं यापूर्वी अनेकदा विवध योगासनाचे फोटो आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केले होते. 

 

बिपाशा बासू
बिपाशा बासू ही देखील कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. बिपाशा नियमितपणे योगा करते. सोशल मीडियावरही ती तिच्या योगाचे तसेच एक्सरसाईजचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

 

 

आलिया भट्ट
आलियानेदेखील इतर अभिनेत्रींप्रमाणे योगाला महत्व दिलं आहे. आलिया आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून योगासनं करते. 

 

 

जॅकलिन फर्नांडिस 
जॅकलिन  ही देखील बॉलिवूडमधली एक फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जॅकलिनचं अनेक व्यायाम प्रकार चाहत्यांना अक्षरश: थक्क करणारे असतात. 

 

 

२०१५ पासून जगात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो.