पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला दिन विशेष : ''अशा स्त्रियांकडे 'अतिशहाणी' म्हणून पाहिलं जातं''

सई ताम्हणकर

'एखादी स्त्री जेव्हा तिचं म्हणणं मांडू पाहते, सर्वांसमोर  आपलं मत ठेवते. तिचे परखड विचार समाजापुढे ठेवते  थोडक्यात तिच्या भूमिकांविषयी ती ठाम असते तेव्हा अशा स्त्रियांकडे 'अतिशहाणी' म्हणून पाहिलं जातं. स्त्रियांनी फक्त सुंदर दिसावं, अकलेचे तारे तोडू नये, असं म्हणणाऱ्यांची  मला भयंकर चीड येते', सविता भाभीच्या निमित्तानं  अभिनेत्री सई ताम्हणकर आपले विचार मांडत होती.

Womens Day Special : ती पंतप्रधान निवडू शकते पण जोडीदार नाही?

मराठीत पहिल्यांदाच बिकीनी घालून सई स्क्रीनवर उवतरली होती. मराठीत असं धाडस यापूर्वी कोणीही केलं नव्हतं तेव्हापासून ते अगदी सविता भाभी या सॉफ्ट पॉर्न प्रकारात मोडणाऱ्या पात्राची भूमिका करण्यापर्यंत सईचा प्रवास तमाम मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच चक्रावून टाकणारा आहे. सईनं या क्षेत्राला 'ग्लॅमर' दिलं आणि 'बोल्ड'पणाही दिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सई 'बिनधास्त' आहे, चौकट मोडणारी आहे म्हणूनच ती आजच्या पिढीतील प्रेक्षकांना आवडणारी आहे. याबद्दल तिला विचारलं तर ती एकच सांगेल 'बिनधास्त असणं किंवा बिनधास्त विचार करणं यात काहीच गुन्हा नाही. तो  तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. या बिनधास्त स्वभावाला मायेनं आपलंसं करा आणि इतरांनाही या स्वभावावर प्रेम करायला भाग पाडा'

सईनं 'सविता भाभी' सारखी भूमिका करण्याचं धाडस केलं यात कदाचित तिच्या चाहत्यांना काहीच आश्चर्य वाटलं नसेल, पण मग अनेकदा बिनधास्तपणासाठी टीका सहन केलेल्या सईनं ही 'रिस्क' का घेतली हेही जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना होतं. पण ती थेट म्हणाली 'यात रिस्क कसली हो, सविता भाभी हे जरी काल्पनिक सॉफ्ट पॉर्न प्रकारातील कॅरेक्टर असलं तरी ती या चित्रपटातून प्रेक्षकांना काय संदेश देतं हे सर्वांत महत्त्वाचं आहे. सविता भाभी ही अशी काल्पनिक स्त्री आहे जिचं सर्वांत जास्त वस्तूकरण झालं आहे. अशी स्त्री समोर येते, प्रश्न मांडते, जाब विचारते ते मला खूपच आवडलं म्हणून ही भूमिका स्वीकारली.'

जागतिक महिला दिन विशेष : ती, तो आणि कपडे

'जेव्हा इतर कोणीही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका चाचपडून  पाहत नाही तेव्हा त्या भूमिका माझ्या असतात', असं सई आत्मविश्वासानं सांगते. 'मी जर नितळ व्यक्तिमत्त्व असलेली भूमिका साकारत असेल तर मला ही गडद भूमिका देखील तितक्याच ताकदीनं साकारता आली पाहिजे. वेगवेगळ्या छटा, कंगोरे असलेल्या भूमिका माझ्या वाट्याला याव्यात असं मला मनापासून वाटतं आणि यातूनच मी ही  भूमिका स्वीकारली', असं सईनं सांगितलं. पण अशी चौकट मोडताना अभिनेत्री म्हणून अनेकदा वाईट अनुभवातूनही जावं लागतं हे ही सईनं मान्य केलं.

कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिला कर्मचारी अधिक समंजस

तशा भूमिका करताना तो गैरसमज होतो
अनेकदा अभिनेत्री तिच्या साच्यात न बसणाऱ्या भूमिका करते, वेगळे प्रयोग करते तेव्हा तिला सॉफ्ट टार्गेटही केलं जातं. कधी कधी काही लोकांना वाटतं की पडद्यावर ती जी व्यक्तिरेखा साकारत आहे किंवा ती जशी दाखवली आहे तिचं पडद्यामागंच व्यक्तिमत्त्वही तसंच आहे का? आणि या प्रश्नातून ती मुलगी 'सहज उपलब्ध' आहे असा गैरसमज लगेच पसरू लागतो. मात्र, ही हीन मानसिकता बदलली पाहिजे. कलाकार हा केवळ भूमिका साकारत असतो त्याचं वैयक्तिक आयुष्य हे यापेक्षा वेगळं असतं हे समजून घ्यायला हवं.

वेगवेगळ्या भूमिका करायला हव्यात
बोल्ड आणि ग्लॅमरस हे वरवरचे शब्द आहेत. कोणत्याही कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका नेहमीच शोधल्या पाहिजेत मग ती सकारात्मक असो, नकारात्मक असो चौकटीत बसणारी असो किंवा न बसणारी असो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on


कुछ तो लोग कहेंगे
चाकोरीबाहेरच्या भूमिका करताना टीका होईल किंवा लोक काय म्हणतील हा विचार करून कधीही माघार घ्यावीशी नाही वाटली कारण टीका ही प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याचा एक भाग आहे. मला जर एखाद्या भूमिकेचं मनापासून आकर्षण वाटत असेल तर कोणताही विचार न करता मी ती भूमिका स्वीकारते. हा माझा निर्णय आहे. टीका ही मी नेहमीच सकारात्मक घेते. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी टीकेचा ताण घेत नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunday Picture ! 📸 @shivajistormsen 🖤

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

- प्रतीक्षा चौकेकर 

pratiksha.choukekar@htdigtal.in