पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून एप्रिलमध्ये हनिमूनला जाण्याचा नेहा- शार्दुलचा निर्णय

नेहा- शार्दुल

 अभिनेत्री नेहा पेंडसे व्यावसायिक शार्दुल बायाससोबत रविवारी विवाहबंधनात अडकली. पुण्याच्या आलिशान हॉटेलमध्ये कुटुंबातील मोजके सदस्य आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित नेहा- शार्दुलचा विवाहसोहळा पार पडला. मात्र लग्न झाल्यानंतर इतर नवविवाहित जोडप्याप्रमाणे हनिमूनला न जाता नेहा आणि शार्दुलनं आपापल्या कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. 

VIDEO : वेश पालटून दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर फिरली आणि....

''शार्दुलवर कामाचा खूप ताण आहे, मीसुद्धा एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. काम खूप असल्यानं आम्ही एप्रिलमध्ये हनिमूनला जाण्याचं ठरवलं आहे. मला चेरी ब्लॉसल खूप आवडतो, मला चेरी वृक्षाला आलेला बहार पाहायचा  आहे. त्यामुळे आम्ही जपानला जाणार आहोत. तेव्हा चेरीला पूर्णपणे बहार आलेला असेल'', असं नेहानं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वधू वरयो:शुभम भवतु सावधान

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

गेल्या वर्षी नेहा शार्दुलला डेट करू लागली. ५ जानेवारीला दोघांचा विवाहसोहळा पार पडला. शार्दुलची पत्नी असल्याचा मला अभिमान आहे,  तो माझ्या आयुष्यात आला याचा मला खूपच आनंद झाला. आम्हा दोघांचं एकमेकांवर खूपच प्रेम आहे असंही नेहानं सांगितलं.

'मलंग'मध्ये अमृता खानविलकरदेखील, भूमिकेसाठी तब्बल १२ किलो वजन केलं कमी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Instead of going on honeymoon immediately Nehha Pendse Shardul has decided to just get back to work for now