पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमाननं सोडला 'इंशाअल्लाह'?

सलमाननं सोडला 'इंशाअल्लाह'

संजय लीला भन्साळी यांच्या 'इंशाअल्लाह' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान आणि भन्साळी कित्येक वर्षांनंतर एकत्र काम करत होते. पण त्याचबरोबर आलिया भट्ट आणि सलमानही पहिल्यांदाच एकाच पडद्यावर दिसणार होते. मात्र या चित्रपटाचं संपूर्ण गणितच बिघडलं आहे. या चित्रपटाला तूर्त स्थगिती देण्यात आल्याचं संजय लीला भन्साळी यांच्या निर्मात्या संस्थेनं म्हटलं आहे.

'इंशाअल्लाह'ऐवजी हा चित्रपट होणार ईदला प्रदर्शित

आता सलमाननंही 'इंशाअल्लाह'कडे पाठ फिरवली असल्याचं म्हटलं जात आहे. 'काही महिन्यांपूर्वी या चित्रपटासाठी  त्यांनी मला  विचारलं होतं. मलाही चित्रपट आवडला होता, आम्ही चित्रपटासाठी एकत्र आलो. पण मला एक ठावूक आहे की भन्साळी आपल्या चित्रपटासोबतही कधीही गद्दारी करणार नाही. हा चित्रपट त्यांना जसा हवाय तसाच तो साकारला जावा अशी माझी इच्छा आहे.', असं सलमान मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.  भविष्यात आम्ही दोघंही नक्कीच एकत्र काम करू.  आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले मित्र म्हणून राहू असंही सलमाननं सांगितलं.

'बबन' चित्रपटातील सुपरहिट जोडी 'राजकुमार'मध्येही

सलमानला चित्रपटाच्या कथेतले काही मुद्दे खटकले. उत्तरार्धातील कथा सलमानला आवडली. मात्र पूर्वार्धात सलमाननं काही बदल सुचवले होते. यामुळेच मतभेद झाल्याचं समजत आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Inshallah will not be made as of now due to Salman Khan and Sanjay Leela Bhansali creative difference